Ad will apear here
Next
कवयित्री अनुराधा पाटील यांच्या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
कवयित्री अनुराधा पाटीलनवी दिल्ली : कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. 

साहित्य अकादमीच्या वतीने बुधवारी, १८ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे देशातल्या २३ प्रादेशिक भाषांमधील विविध साहित्य प्रकारांत सर्वोत्कृष्ट साहित्यकृती आणि लेखकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. २५ फेब्रुवारी २०२० रोजी पुरस्कार वितरण होणार असून, एक लाख रुपये, ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

कवयित्री अनुराधा पाटील गेली ४० वर्षे काव्यलेखन करत असून, ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहातून त्या माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करतात.  

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZLJCH
Similar Posts
अनुराधा पाटील यांच्या कविता म्हणजे स्त्री मनाच्या भावनांचा आविष्कार कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी माहिती देणारा हा लेख...
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
‘खेती करो हरिनाम की, मनवा...’ खेती करो हरी नाम की मनवा, खेती करो हरी नाम की। पईसा ना लागे रुपिया ना लागे, कवडी न लागे फुटकी।। मन के बैल सुरत पोहावे, रसि लगाऊँ गुरू ग्यान की। कहत कबीरा सुन भाई साधु, भक्ति करो हरीहर की।। या आणि यांसारख्या कबीराच्या दोह्यांनी शिवाजी विद्यापीठाचा परिसर मकर संक्रांतीच्या दिवशी (१५ जानेवारी २०२०) नादमय होऊन गेला होता
कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितांचे अभिवाचन (व्हिडिओ) १० मार्च हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन. पाडगावकर म्हणजे जीवनाचं आनंदी गाणं गाणारे आणि सकारात्मकतेचा संदेश आपल्या कवितांतून देणारे कवी. ‘चिऊताई, चिऊताई दार उघड!’ आणि ‘सांगा कसं जगायचं?’ या त्यांच्या कविताही त्याचीच साक्ष देतात. पुण्यातील गायिका आणि अभिवाचक चैत्राली अभ्यंकर यांनी या केलेल्या या कवितांच्या अभिवाचनाचा व्हिडिओ पाहा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language